शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्ये लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:06 IST

नाशिक  :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा  घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस  पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

ठळक मुद्देइंदिरा गांधी रूग्णालयातील प्रकार पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला

नाशिक  :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा  घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस  पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

आम्ही पहाटे साडे पाच वाजल्यापासून इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर रांगेत लस घेण्यासाठी उभे होतो. सकाळी नंबरआला त्यावेळी लस नाही, आजचा कोठा संपला असे स्पष्ट करण्यात आले. आम्ही आता परत पहाटे येऊन रांगेत उभे राहायचे का’ असा सवाल करत कोरोना पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त करीत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर गोंधळ घालून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. अखेर घटनास्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी नागरिकांची समजूत काढल्यावर माघारी फिरावे लागले.

महापालिकेने आज केवळ ४५ वर्षावरील लसीकरणाचे नियोजन केल्यानंतरही  दिवशी शेकडो नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी भल्या पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मात्र रुग्णालयात केवळ दोनशेच्या आसपास डोस आल्याने प्रशासनाची डोकेदुखी ठरली. सकाळी आलेल्या लस नागरिकांना देण्यात आल्या. मात्र लस डोस २०० आणि नागरिक ५०० अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या नागरिकांना रांगेत उभे राहून लस मिळाली नाही त्यांनी मोठा गोंधळ घातला. त्यावेळी मोठी गर्दी निर्माण होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर घटनास्थळी पंचवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिक माघारी फिरले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorona vaccineकोरोनाची लस