शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
5
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
6
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
7
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
8
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
9
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
10
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
11
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
12
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
13
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
14
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
15
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
16
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
17
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
18
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
19
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
20
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!

शाळांच्या सुट्यांचा गोंधळ

By admin | Published: November 25, 2015 11:43 PM

आदेशाचा संभ्रम : काही शाळा सुरू तर काही डिसेंबरमध्ये

नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या कालावधीतील सुट्या समायोजित करताना शहरातील शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळी सुटीनंतर शाळा कधी सुरू कराव्या याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे सुस्पष्ट आदेश नव्हते अथवा त्यांच्या आदेशाचे आकलन झाले नाही परंतु काही माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. काही शाळा गुरुवारी (दि. २६) सुरू होणार आहेत, तर काही शाळा चक्क २ डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.या शाळांच्या गोंधळामुळे अनेक शाळांमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रमच होणार नसल्याचे वृत्त असून या गोंधळाला जबाबदार कोण यावरून संघटना अधिकाऱ्यांनाच दोषी धरत आहेत. यंदा नाशिक शहरात कुंभमेळा असल्याने तीन पर्वण्यांच्या दरम्यान पोलिसांनी वाहतूक निर्बंध घातले. त्यामुळे तीन पर्वण्या मिळून किमान सहा ते नऊ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सुट्या दिवाळी सुट्टीतून वगळण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थाचालकांना कळविले होते; मात्र प्रत्यक्षात संस्थाचालकांचा गोंधळ उडाला. काही शाळा या २३ रोजी सुरू झाल्या, तर काही २६ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत.