शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संघटनेच्या बैठकीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:57 IST

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काही काळ गोंधळ व बाचाबाची झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत वरखेडे, सचिन हांडगे, अनिल मंडलिक, माजी सरचिटणीस संजय कुटे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची शेळके, ढोमसे यांनी उत्तरे दिली.

ठळक मुद्दे पोलिसांचा हस्तक्षेप : एचएएल कामगारांच्या दोन्ही गटांत बाचाबाची

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काही काळ गोंधळ व बाचाबाची झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत वरखेडे, सचिन हांडगे, अनिल मंडलिक, माजी सरचिटणीस संजय कुटे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची शेळके, ढोमसे यांनी उत्तरे दिली.या गोंधळातच संजय कुटे यांनी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या असलेले पाच प्रश्न उपस्थित केले. त्यास अध्यक्ष व सरचिटणीस यांनी उत्तरे न देता सत्ताधारीगटाने कुटे यांना खाली बसा असे सांगितले. तर माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत मी खाली बसणार नाही अशी भूमिका कुटे यांनी घेतली. यामुळे गोंधळ वाढतच होता, शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. कुटे पुन्हा बोलू लागले तेवढ्यात माइक बंद करण्यात आला. पोलिसांनी सभेची वेळ संपली असे सांगितल्याने अध्यक्ष शेळके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.ओझर टाउनशिप येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. शेळके होते. व्यासपीठावर सरचिटणीस सचिन ढोमसे, कार्यकारी अध्यक्ष अशोक गावंडे, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, पवन आहेर, योगेश ठुबे, प्रकाश गबाले, कमलेश धिंगाणे, अनंत बोरसे, सचिन दीक्षित, सहचिटणीस गिरिजाकांत वलवे, दीपक कदम, आनंद गांगुर्डे, मिल्ािंद निकम, योगेश देशमुख, संतोष पोकळे, खजिनदार अमोल जोशी, संघटक सचिव मनोज भामरे हे उपस्थित होते.दुपारी साडेतीन वाजता कोरमअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेस पावणेचार वाजता पुन्हा प्रारंभ झाला. प्रारंभी बापू भामरे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर अध्यक्ष शेळके यांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करून गेल्या वर्षभरात कामगार संघटनेने केलेल्या कामाचा आढावा सभेसमोर मांडला, तसेच वेतन करार, पुढील कामाची माहिती याविषयी सभासदांना माहिती दिली. यानंतर विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन करून प्रत्येक विषयास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. खजिनदार अमोल जोशी यांनी वार्षिक जमा-खर्च व ताळेबंद मांडला. यावेळी आनंद बोरसे, सुरेश पाटील, मंगेश थेटे,राजू मोरे, राजशेखर जाधव नितीन पगारे, मन्सूर शेख, प्रसाद गायकवाड, महेंद्र जाधव, जाहिद खान, सागर कदम, रमेश कदम, नवनाथ मुसळे, रमेश कदम, सुनील जुमळे, चेतन घुले, संतोष अहेर यांचे सह आजी माजी पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन बापू भामरे यांनी केले तर योगेश देशमुख यांनी आभार मानले.दोन्ही गटांकडून घोषणाबाजीसंजय कुटे यांनी माइकचा पुन्हा ताबा घेतला आणि शांततेत सुरू असलेल्या सभेत सत्ताधारी गटाकडून त्यांना बोलू देण्यास विरोध केला गेला. यामुळे विरोधी गटासह दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली व सभेत गोंधळास सुरुवात झाली. दोन्ही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या गोंधळातच बाचाबाचीचे प्रकारही घडले.