शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:27 IST

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवार व निवडणूक अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीसाठी सोमवारपर्यंत मुदतछाननीही लांबणीवर

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवार व निवडणूक अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुदत संपणाºया ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणुकीबरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणाºया राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ५ ते १० फेब्रुवारी आॅनलाइन नामांकन, १२ फेब्रुवारीला छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत होती. राखीव जागांसाठी उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा व मंत्रिमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अधिसूचनेत बदल केला, तर १० फेब्रुवारी नामांकन स्वीकारण्याची अंतिम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरीत्या बदल केला.नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येईल. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारीला मतदान होऊन दुसºया दिवशी मतमोजणी होईल. ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिकाºयांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवार सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा, असा प्रश्न पडला आहे. वेळेनंतर नामांकन राज्य निवडणूक आयोगाच्या लहरी कारभाराचा फटका अनेक वेळा निवडणूक अधिकाºयांना बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ असत, त्यात आयोगाने बदल करून आता दुपारी ४.३० वाजेपर्यंत केली होती. शासकीय कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्याने आयोगाच्या वेळ बदलाविषयी कोणाची हरकत नसली तरी आता नवीन कार्यक्रमानुसार आयोगाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नामांकनाची मुदत वाढविली आहे. शासकीय कामकाजाची मुदत टळून गेल्यावर कर्मचाºयांना काम करावे लागणार असून, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. अधिकाºयांची तारेवरची कसरत नव्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाºयांना धावपळ करावी लागत आहे. उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना १४ रोजी अर्जाची छाननी होणार असल्याचे पत्र द्यावे लागणार आहे. एखाद्या उमेदवाराला पत्र न मिळाल्यास त्याच्याकडून न्यायालयात निवडणुकीला आव्हान दिले जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.नवीन कार्यक्रमानुसार आयोगाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नामांकनाची मुदत वाढविली आहे. शासकीय कामकाजाची मुदत टळून गेल्यावर सहानंतर कर्मचाºयांना काम करावे लागणार आहे.निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक कार्यक्रमात बदल केल्याने अधिकाºयांना धावपळ करावी लागत आहे. ज्या उमेदवारांनी शनिवारच्या अगोदर नामांकन दाखल केले त्यांना त्याचवेळी दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाºया अर्ज छाननीप्रसंगी उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले असून, आता अशा उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा दि. १४ रोजी अर्जाची छाननी होणार असल्याचे पत्र द्यावे लागणार आहे. यातच एखाद्या उमेदवाराला जर पत्र मिळाले नाही तर त्याच्याकडून न्यायालयात निवडणुकीला आव्हान दिले जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. याशिवाय मतदान २५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने मतदान केंद्राविषयी निर्धास्त असलेल्या अधिकाºयांना आता दि. २७ रोजी मतदान घेण्याची नव्याने तयारी करावी लागणार आहे.