शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी एकत्रीकरण बदल्यांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:09 IST

नाशिक : बदल्यांसाठी शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज करताना गैरप्रकार करतानाच अपंगांचे बोगस प्रमाणपत्र तसेच चुकीचे अंतर नोंदविल्यामुळे शिक्षक बदल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून, प्रथमदर्शनी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांनीच चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे आढळून येत आहे. अर्थात संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी झाली नसल्याने याबाबतच शिक्षण विभागाकडून चुकीच्या बदल्यांबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ठळक मुद्दे प्राथमिक अंदाज : अनेक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये बदल शक्य

नाशिक : बदल्यांसाठी शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज करताना गैरप्रकार करतानाच अपंगांचे बोगस प्रमाणपत्र तसेच चुकीचे अंतर नोंदविल्यामुळे शिक्षक बदल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून, प्रथमदर्शनी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांनीच चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे आढळून येत आहे. अर्थात संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी झाली नसल्याने याबाबतच शिक्षण विभागाकडून चुकीच्या बदल्यांबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही.जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी झाल्याने शिक्षकांच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. बदलीसाठी अर्ज दाखल करताना नियमभंग करीत अनेक शिक्षकांनी सोयीच्या बदल्यांसाठी अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्याने बदलीपात्र शिक्षकांवर अन्याय झाल्याने ते विस्थापित झाले आणि अखेर त्यांना सरसकट बदल्यांना सामोरे जावे लागले.याप्रकरणी विस्थापित झालेल्या शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतानाच चुकीच्या कागदपत्रांची आणि शिक्षकांचीही प्रत्यक्ष पडताळणी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या दोन दिवसांपासून कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. गुरुवारी नाशिक तालुक्यासह अन्य काही तालुक्यांमधील अर्जांची पडताळणी करण्यात आली तर शुक्रवारी कळवण, येवला, दिंडोरी, मालेगाव आणि चांदवड तालुक्यांमधील बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.अधिकाऱ्यांवरही संशयकागदपत्रांची पडताळणी करणाºया समितीमधील अधिकाºयांवरच विस्थापित शिक्षकांच्या कृती समितीने आक्षेप घेतल्यामुळे समितीने कागदपत्रांची पडताळणी करूनही फारसे काही हाती लागण्याची शक्यता कमीच आहे. विस्थापित शिक्षक अगोदरच कोर्टात गेले आहे तर बदली झालेल्या शिक्षकांची पुन्हा नव्याने बदली केली तर त्याच्याकडून समितीवर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलीचे हे गुºहाळ सुरूच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलीप्रकरणी काही शिक्षक संघटनांंनी बदलीचा अधिकार शासनाचा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेने आक्षेप नोंदविण्याची आवश्यकता नसल्याचादेखील दावा केला आहे.प्रमाणपत्र खोटेकसे ठरविणार?च्मिळालेल्या माहितीनुसार संवर्ग १ मध्ये अपंग प्रमाणपत्राबाबत तीन अधिकाºयांच्या स्वाक्षरी असल्याने तीन अधिकाºयांना एका शिक्षकाच्या म्हणण्यानुसार खोटे कसे ठरविणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अपंगांच्या प्रमाणपत्रांवर हरकत घेण्याचा मुद्दा हा जिल्हा शल्य-चिकित्सकांच्या कोर्टात ढकलण्याची शक्यता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद