शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘नार-पार’साठी एकजुटीने संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:35 IST

नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी साकोरा येथे केले.

साकोरा : नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी साकोरा येथे केले. कोरा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वात दुष्काळी असलेला नांदगाव तालुक्याचा गेल्या पन्नास वर्षातील विकासाचा अनुशेष भरून काढून येणाºया पिढीला तरी अच्छे दिन पहायला व उपभोगायला मिळावेत म्हणून आपण आजच्या पिढीने नार- पारच्या पाण्याची तरतूद करून ठेवायला पाहिजे. केवळ शेती सुजलाम करून चालणार नाही तर परिसराचा औद्योगिक व शैक्षणिक विकासही झाला पाहिजे. त्यासाठी नांदगाव तालुक्याचा नार-पारच्या डीपीआरमध्ये समावेश करण्यासाठीचा पहिला लढा उभारूया, असे आवाहन परदेशी यांनी केले.रमेश बोरसे म्हणाले की, नार - पार प्रकल्पासंदर्भात तालुक्याच्या खेडोपाडी स्वत: पदरमोड करून उपाशीपोटी फिरणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी, नीलेश चव्हाण, परशराम शिंदे, योगेश बोदडे, विशाल वडघुले, निवृत्ती खालकर व इतर सहकाºयांची तळमळ ही अभिनंदनीय असून, आपण सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तालुक्याच्या दुष्काळाचा ऊहापोह करताना, तालुक्याला खंबीर नेतृत्व न लाभल्याने तालुक्याची मोठी परवड झाली असल्याचे बोरसे यांनी सांगितले. त्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आलेले असून, जनतेनेसुद्धा सक्रियतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा दिला.  प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवदत्त सोनवणे यांनी केले. उपसरपंच संदीप बोरसे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब बोरसे, दादा बोरसे, कॉ. देवचंद सुरसे, प्रल्हाद काका बोरसे, मोगल गुरुजी, तेजूल बोरसे, गणेश बोरसे, सुरेश बोरसे, मधुकर सूर्यवंशी, प्रशांत बोरसे, माणीक हिरे, जगन सुरसे, राजेंद्र बोरसे, जिजाऊ पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीriverनदी