शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

नाशिकच्या कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयावर जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:02 IST

मिळकत कराची थकबाकी : शहरातील ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई

ठळक मुद्दे महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई २१ मालमत्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला तर ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम भरत जप्तीच्या कारवाईतून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे

नाशिक - महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये, प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ, आयमा या उद्योजक संस्थांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. नोटीस बजावल्यापासून २१ दिवसात संबंधितांनी थकबाकीचा भरणा न केल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मालमत्तांची थेट विक्री केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.महापालिकेने ३१ मार्चपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीच्या थकबाकी वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले असून गेल्या काही दिवसांपासून मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. त्यासंबंधीच्या नोटीसा बजावल्या जात आहेत. महापालिकेने आतापर्यंत ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. त्यातील २१ मालमत्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला तर ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम भरत जप्तीच्या कारवाईतून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत महापालिकेने ८४ लाख ८९ हजार रुपये थकबाकी वसुल केली आहे. दरम्यान, महापालिकेने महात्मा गांधीमार्गावरील नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या मालमत्तेवरही जप्तीची कारवाई केली आहे. जिल्हा कॉँग्रेस भवनकडे २६ लाख ६३ हजार रुपये घरपट्टी थकीत आहे. महापालिकेने यापूर्वीही कॉँग्रेस कमिटीला जप्तीची नोटीस बजावली होती. दोन वर्षापूर्वी कॉँग्रेस कमिटीने दहा लाख रुपयांचा भरणाही केला होता. आता महापालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावतानाच जप्तीची कारवाई केली असून २१ दिवसात थकबाकीचा भरणा न केल्यास कॉँग्रेस भवनचा लिलाव करत ते विक्रीला काढले जाणार आहे. याशिवाय, महापालिकेने सार्वजनिक वाचनालयावरही जप्तीची कारवाई केली आहे. सावानानेही मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास नियमानुसार विक्री केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्तांनी दिली. सावानाकडे ७ लाख ७८ हजार रुपये थकबाकी आहे. महापालिकेने सातपूर विभागातील सिकॉफचे कार्यालय (१ लाख ३ हजार), सिडको विभागातील आयमाचे कार्यालय (१४ लाख ७४ हजार), सिडको डाकघर (२४ हजार), पूर्व विभागातील जिल्हा सहकार भवन (१४ लाख १७ हजार), हॉटेल वूडलॅँड (३५ लाख १९ हजार), नाशिकरोड विभागात आयसीआयसीआय बॅँक (१४ लाख), पश्चिम विभागातील माथाडी कामगार मंडळ (२ लाख ७७ हजार), पंचवटी विभागातील सेवाकुंज ट्रस्टी (१५ लाख ३८ हजार) आदींनाही नोटीसा बजावत जप्तीची कारवाई केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर