शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

‘त्या’ मतदारांची होणार खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:37 IST

नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. सोमवारी यासंदर्भात मंगरूळे यांच्या समक्ष मनसेच्या तक्रारीची सुनावणी करण्यात आली.

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. सोमवारी यासंदर्भात मंगरूळे यांच्या समक्ष मनसेच्या तक्रारीची सुनावणी करण्यात आली.  गेल्या आठवड्यात महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नाशिक पूर्व विधानसभेच्या अंतिम मतदार यादीत एक लाख १२ हजार मतदारांची दुबार नावे घुसडविण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच त्याच नावाच्या व्यक्तींची त्यांच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता त्या पत्त्यावर सदरच्या व्यक्ती राहात नसताना मग त्यांची नावे मतदार यादीत कशी समाविष्ट करण्यात आली, असा सवाल करून मनसेने एकप्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारी व सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींची हात मिळवणी झाल्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात वर्षभरापूर्वी निवेदन देऊनही निवडणूक अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, मनसेच्या तक्रारीची दखल घेत पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी मनसेला नोटीस बजावून तक्रारीसंदर्भात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी डॉ. मंगरूळे यांच्याकडे जाऊन मतदार यादीतील ज्या मतदारांच्या नावांना आक्षेप आहेत त्यांची यादी सुपूर्द केली व दुबार नावे वगळण्याची विनंती केली. डॉ. मंगरूळे यांनी मनसेची बाजू ऐकून घेत, याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सॉप्टवेअरची मदत आता निवडणूक आयोगाकडून दुबार नावे शोधण्यासाठी तयार केलेल्या सॉप्टवेअरच्या माध्यमातून दुबार नावे शोधली जाणार असून, ज्यांची नावे दुबार सापडतील त्यांना आयोगाकडूनच नोटीस बजावण्यात येणार आहे. शिवाय दुबार नावे असलेल्या मतदारांचे वय, पत्ते, लिंग, मतदार संघ याची माहितीही बीएलओंकडून खात्री करून घेण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे दुबार असतील त्यांना नोटीस बजावून निवडणूक अधिकाºयांकडे समक्ष हजर केले जाईल व कोणत्याही एका मतदारसंघात नाव ठेवण्याबाबतचे लिहून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक