शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मॉडेल कॉलनी परिसरात पाण्याचा ठणठणाट नागरिक त्रस्त : सिडकोसाठी अन्य भागांवर अन्याय

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

नाशिक : मॉडेल कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको विभागात जादा पाणी देण्यासाठी या परिसरातील पाणी पळवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पालिकेने त्वरित मुबलक पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांबरोबरच प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी दिला आहे.

नाशिक : मॉडेल कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको विभागात जादा पाणी देण्यासाठी या परिसरातील पाणी पळवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पालिकेने त्वरित मुबलक पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांबरोबरच प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून मॉडेल कॉलनी, यशवंत कॉलनी, कल्पनानगर या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सकाळी किंवा सायंकाळी पाणीच येत नाही आणि आले तरी इतके अल्प दाबाने आणि अल्प प्रमाणात असते की त्याचा उपयोग होत नाही. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि छाया ठाकरे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली, तसेच महापालिकेच्या अभियंत्यांनादेखील पाणीपुरवठ्याची स्थिती दाखवली; परंतु तरीही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट अभियंत्यांमध्येच विसंवाद दिसून आला आहे. सातपूर विभागात पपया नर्सरी येथे पाणीपुरवठ्यासाठी व्हॉल्व्ह आहे. तेथून जलवाहिनीद्वारे महात्मानगर आणि समर्थनगर येथील रामराज्य जलकुंभात पाणी उपलब्ध होते. याच व्हॉल्व्हच्या माध्यमातून सिडकोला पाणीपुरवठा केला जात असून, महात्मानगर, मॉडेल कॉलनी परिसराचे पाणी सिडकोला वळवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.महापालिकेने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्या कार्यालयात नागरिक हंडे घेऊन ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा नगरसेवक शिवाजी गांगुर्डे तसेच शिरीष चौघुले, प्रसाद पवार, सागर सोनवणे, प्रफुल्ल काठे, किशोर जगताप, चंदू कुलकर्णी यांनी दिला आहे.