लोहोणेर : येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरकारच्या डिजिटल इंडियाच्या उपक्रमाचे तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी या विषयांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी एमकेसीएलचे मंगेश खैरनार व जयश्री साळुंके यांनी विद्यार्थ्यांसाठी ध्वनी चित्रफितीच्या साह्याने भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या अभिनव उपक्रमाचे कशा पद्धतीने आपल्याला शासकीय, शैक्षणिक वैयक्तिक दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग होऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या डिजिटल उपक्र माची माहिती करून दिली. या उपक्र मावर आधारित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जे. जे. सोनवणे, डी.डी. खैरनार, बी.एम. सूर्यवंशी, एस. टी. महिरे, व्ही.के. पवार, एस. बी. एखंडे, एस.झेड. चव्हाण, पी.जे. पगार, जी.यू. खैरनार, एस.डी. ठाकरे, एस.पी. आहेर, एस.एम. पाटील, बी. ए. गुजरे, श्रीमती पी.डी. आहिरे, एस. एम. गुजर आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रणव नेरकर, चंद्रकांत वाघ, प्रियंका निकम, भाग्यश्री शेवाळे, गायत्री महाजन, निखिल ह्याळीज, रोहित सूर्यवंशी, ललित बोरसे, स्नेहा सोनवणे, वैभव वाघ, श्याम काकुळते, दक्षता शिरसाठ, अश्विनी खैरनार, वृषाली भामरे यांना गौरविण्यात आले.
माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:59 IST