शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

अवयवदान जनजागृतीसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:37 IST

अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आॅर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

नाशिक : अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आॅर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.स्वराज फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.२१) सकाळी ‘रन फॉर आॅर्गन’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली. तत्पूर्वी सहस्त्रनाद, महिलांचे ढोल पथक, विविध संस्थांचे बँड पथक, लेजीम पथक यांनी प्रात्यक्षिके करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच सुषमा दुग्गड यांचे हास्यक्लब व सई संघवी यांचे झुम्बा प्रात्यक्षिक आकर्षण ठरले.‘रन फॉर आॅर्गन’मध्ये शेकडो तरुण, तरुणींसह वृद्धांनीही नोंदणी करत सहभाग घेतला. दरम्यान, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सौंदर्यवती नमिता कोहोक, नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, आंतरराष्टÑीय धावपटू मोनिका आथरे, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल, मोतीवाला कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर स्वानंद शुक्ला, नगरसेवक समिना मेमन, डॉ. विक्रांत जाधव, अ‍ॅड. आकाश छाजेड आदी मान्यवरांनी सहभाग घेत सहभागी नाशिककरांचा उत्साह वाढविला.प्रारंभी संयोजक योगीता खांडेकर यांनी उपस्थिताना रनची संकल्पना समजावून सांगितली. सहभागी नागरिकांना फाउंडेशनकडून पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मोठ्यासंख्येने नागरिक उपस्थित होते.८६ वर्षांचे आजोबा अन् विशेष विद्यार्थ्याने वेधले लक्षरन फॉर आॅर्गन या उपक्रमात एक ८६ वर्षीय डॉ. सुब्रमण्यम व स्वयम पाटील या विशेष विद्यार्थ्याने सहभागी होऊन ऊर्जा वाढविली.नियतीने जरी व्यंग दिले असले तरी त्यावर जिद्दीने मात करता येते, हे स्वयमने दाखवून देत अवयवदान जनजागृतीसाठी आपला सहभाग नोंदविला.नाशिक केंब्रिज हायस्कूल, मोतीवाला मेडिकल कॉलेज, ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वाद्य वाजवून व लेजीमचे प्रात्यक्षिक सादर केले.

टॅग्स :Healthआरोग्यOrgan donationअवयव दान