शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 18:05 IST

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.

ठळक मुद्देसुभाष भामरे : सटाणा येथे लाभार्थी मेळावा

सटाणा : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाकडून समाजातील गोरगरीब घटकांच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आॅनलाइन प्रणाली स्वीकारण्यात आली असून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आॅनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होत आहे.त्यामुळे साहजिकच गरजू लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली असून त्यांची दलालीपासून सुटका झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.डॉ.भामरे यांच्या हस्ते तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ.भामरे यांनी बागलाण तालुक्यासाठी आगामी काळात घरकुल उिद्दष्ट वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगून आपण त्या समतिीवर चेअरमन असल्याने तालुक्यासाठी अधिकाधिक घरकुले मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.यावेळी त्यांनी मोदी शासनाकडून गोरगरीब वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना आण िकार्यक्र मांची माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव,नेते डॉ. विलास बच्छाव, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पाटील आदींची भाषणे झाली.तालुका गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक करून मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली.कार्यक्र मासाठी प्रांताधिकारी प्रवीण महाजन,तहसीलदार प्रमोद हिले,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींसह डॉ.शेषराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे,कण्हू गायकवाड,साधना गवळी,लता बच्छाव,पंचायत समतिी सभापती विमल सोनवणे,उपसभापती शीतल कोर,सटाणा नगर पालिकेचे नगरसेवक,सटाणा व नामपूर बाजार समतिीचे संचालक व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.मेळाव्यासाठी तालुक्यातून आलेले शेकडो घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.भाजपा सरकारने केली दलाली बंदकॉंग्रेस सरकारच्या काळात दिल्लीहून जर शंभर रु पये पाठविले तर गावापर्यंत केवळ दहा रु पये पोहचत होते.भाजप सरकारने यात कमालीच्या सुधारणा करत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची दलाली बंद केली असून प्रत्येक योजनेचा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करून पारदर्शक काम सुरु केले आहे.यापलीकडेही शासनाच्या योजनेसाठी जर कोणी अधिकारी किवा कर्मचारी लाभार्थ्याकडे पैशांची मागणी करत असेल तर थेट माङयाकडे तक्र ार करा असेही त्यांनी भरसभेत सांगितल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी टाळ्या वाजवून डॉ.भामरेंचे स्वागत केले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक