शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्याची पाणी योजना सहा महिन्यात पूर्ण करू :  देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:24 IST

येत्या सहा महिन्याच्या आत सटाणा शहराची पाणी योजना असो अथवा सिंचन योजना पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना दिली.

सटाणा : येत्या सहा महिन्याच्या आत सटाणा शहराची पाणी योजना असो अथवा सिंचन योजना पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना दिली.धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ येथील पाठक मैदानावर बुधवारी (दि.२४)जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, महाआघाडीचे नेते राहुल गांधी दूरचित्रवाहीनीवरील मालिकेतील काल्पनिक पात्राप्रमाणे केवळ मनोरंजन करत आहेत, त्यांचे कोणी मनावर घेऊ नये अशी खिल्ली उडवत त्यांनी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार दिलीप बोरसे, भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, अण्णा सावंत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.सर्वमान्य तोडगा काढूसटाणा शहरासाठी संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल. येत्या सहा महिन्यात  या भागातील सर्वच सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासनही त्यांनी  यावेळी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdhule-pcधुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा