शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सात सायकलपटूंची ब्रेव्हे स्पर्धा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायकलिंग ब्रेव्हे सात सायकलिस्ट्सनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्ट्सनी या ब्रेव्हेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासांत नाशिक-रतलाम (मध्य प्रदेश)-नाशिक हे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून एक हजार किमीचे अंतर पूर्ण केले, तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अ‍ॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासांत, तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासांत ब्रेव्हे स्पर्धा पूर्ण केली.

नाशिक : नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायकलिंग ब्रेव्हे सात सायकलिस्ट्सनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्ट्सनी या ब्रेव्हेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासांत नाशिक-रतलाम (मध्य प्रदेश)-नाशिक हे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून एक हजार किमीचे अंतर पूर्ण केले, तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अ‍ॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासांत, तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासांत ब्रेव्हे स्पर्धा पूर्ण केली. शुक्रवारी (दि. २२) एक हजार किमीची ही ब्रेव्हे मुंबईनाका, नाशिक येथून सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ वरून सरळ मध्य प्रदेशातील मानपूर-रतलाम आणि पुढे नामली नावाच्या गावी (जे नाशिकपासून ५०३ किमी आहे), तेथून यू टर्न घेत त्याच मार्गाने सायकलिस्ट्स नाशिककडे परतले. एकूण १००६ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी ७५ तासांची वेळ दिलेली होती. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ब्रेव्हेच्या मार्गावर एक वाहन उपलब्ध होते. यात निखिल भावसार आणि संदीप परब यांनी पूर्ण ७५ तास सायकलिस्ट्सची देखरेख पाहिली.  नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. महेंद्र महाजन गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून सायकलिंग ब्रेव्हे (वेळबद्ध आणि स्वावलंबी सायकॉलॉथन्स) सुरू केले आहेत. हे ब्रेव्हे आॅडेक्स इंडिया रँडेनॉर आणि आॅडेक्स क्लब पॅरिसन, फ्रान्स यांच्याशी संलग्न आहेत. पहिली २०० किमीची ब्रेव्हे एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानंतर डॉ. महाजन यांनी नाशिक परिसरातील विविध मार्गांवर २००, ३००,४०० आणि ६०० किमी ब्रेव्हे यशस्वीरीत्या आयोजित केल्या आहेत. या सर्व ब्रेव्हेचे मार्ग नाशिक शहरातून सुरू होत शहरातच समाप्त होणारे (रिटर्न लूप) आहेत. असा आहे एक हजार किमी ब्रेव्हेचा इतिहास आत्तापर्यंत नाशिकमधील ११ सायकलिस्ट्सनी एक हजार किमीची ब्रेव्हे पूर्ण केली असून, त्यात डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, मोहिंदरसिंग भराज यांनी २०१४ मध्ये, तर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी २०१५ मध्ये, ज्ञानेंद्र शर्मा यांनी २०१६ मध्ये, तर आज आनंद गांगुर्डे, अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे,  अ‍ॅड. दत्तात्रेय चकोर यांनी एक हजार किमी ब्रेव्हे पूर्ण केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक