शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सुरगाण्यात  आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST

तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

सुरगाणा : तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.  या बैठकीकडे वनविभाग अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदींसह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आढावा बैठकीत चर्चा करून तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार ही अपेक्षाच फोल ठरली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी उपस्थित अधिकारी वर्गावरच राग व्यक्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली. तालुक्यातील विकासकामांचा सुमार दर्जा पाहून खासदार चव्हाण यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. तालुक्यात चांगली कामे करून दाखवा. दुष्काळाची चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मात्र अधिकारीच गैरहजर आहेत. पाऊस कमी झाल्याने भात, नागली, वरई आदी पिके निसवलीच नाही, जी पिके जेमतेम निसवली त्यात दाणे भरले नाहीत. तालुके दुष्काळी जाहीर करताना शासनाने नेमके कोणते निकष लावले हे कळायला मार्ग नाही. पन्नास टक्केपेक्षाही कमी पीक आले आहे त्यामुळे आणेवारी पन्नास पैसांपेक्षा कमी जाहीर करून सरकारला कळवावी, अशी सूचना त्यांनी केली.आढावा बैठकीत मनखेड, पोहाळी, गारमाळ, दुर्गापूर, खुंटविहीर या अपूर्ण व रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सुरेश थवील व आनंदा झिरवाळ यांनी केली. काठीपाडा, पळसन येथील ग्रामपंचायतींत झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खासदार चव्हाण यांनी दिल्या. सुरगाणा शहरातील बसस्थानकाजवळील पिण्याच्या पाण्याची विहीरच चोरीला गेली आहे तिचा तपास करावा, बसस्थानकातील अतिक्र मण हटवावे आदी मागण्या माजी नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी केल्या. बैठकीदरम्यान शिक्षण, पाटबंधारे, महसूल, कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्याा संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घांघळे सतत गैरहजर राहात असल्याचे भास्कर चौधरी यांनी तक्र ार केली. पळसन येथे एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तेथे कर्मचारीच गोळ्याऔषधे देतात. रात्री उपचारासाठी गेल्यावर रात्री दवाखान्यात येण्याची वेळ आहे का अशी विचारणा परिचारिकाकडून केली जाते, अशी तक्रार आमदाचे रामचंद्र जाधव यांनी केली. अंबाठा ते पिंपळसोंड, गुजरात सीमेलगतच्या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. तालुक्यात सीमेलगतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, तसेच गॅसधारकांचे रॉकेल बंद करू नये. वीज नसल्याने चिमणी पेटविण्याकरिता रॉकेल लागते, याबाबत रतन चौधरी यांनी तक्र ार केली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आदिवासी सेवक मोतीराम गावित होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कळवणचे प्रकल्प अधिकारी आशियाना, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, तालुका कृषी अधिकारी डमाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जाधव, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन.डी. गावित, शिवसेना तालुकाध्यक्ष मोहन गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण, भरत वाघमारे, भावडू चौधरी, रमेश थोरात, ललित चव्हाण, चिंतामण कामडी, हरिभाऊ भोये, विजय कानडे, आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, माजी सरपंच भास्कर चौधरी, जाहुलेचे सरपंच सुनील भोये आदींसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणdroughtदुष्काळ