शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

‘मैत्रेय’च्या १५५० गुंतवणुकदारांनी केल्या पोलिसांकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:11 IST

गुंतवणूदार फसवणूक प्रकरणात मैत्रेय कंपनीतील संचालकांविरोधात गुन्हे दाखल असून पोलीस महासंचालकांनी सनियंत्रण समिती गठीत केली आहे़ त्यानुसार गत तीन दिवसांमध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या एक हजार ३०० ठेवीदारांनी शहर पोलीस आयुक्तालयात, तर मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील २५० गुंतवणूकदारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत.

नाशिक : गुंतवणूदार फसवणूक प्रकरणात मैत्रेय कंपनीतील संचालकांविरोधात गुन्हे दाखल असून पोलीस महासंचालकांनी सनियंत्रण समिती गठीत केली आहे़ त्यानुसार गत तीन दिवसांमध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या एक हजार ३०० ठेवीदारांनी शहर पोलीस आयुक्तालयात, तर मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील २५० गुंतवणूकदारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत.  मैत्रेय फसवणूक प्रकरणात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल केलेले असून कंपनीची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे़ कंपनीच्या जप्त केलेल्या ३०८ मालमत्ताबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाणार आहे़मैत्रेय कंपनीच्या अनेक उपकंपन्या असून, त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आपल्या तक्रारी शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे देता येणार आहे़ठेवीदारांमध्ये संभ्रमनाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्याचे अर्ज स्वीकारले जात असून आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेडचे अर्ज स्वीकारले जात आहेत़ मात्र मैत्रेय सुवर्णसिद्धीचे गुंतवणूकदार शहर पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज घेऊन जात आहेत़

टॅग्स :PoliceपोलिसfraudधोकेबाजीNashikनाशिक