शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेविषयी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:14 IST

शासकीय रुग्णालयांमध्ये अपुºया खाटा, खासगी रुग्णालयांची मनमर्जी, आरोग्य यंत्रणेकडून उपचारात होणारा हलगर्जीपणा यासह विविध तक्रारींचा शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाढा वाचला. नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी असून, अजूनही कोरोनावर उपचारासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आक्रमक : अपुऱ्या खाटा, उपचारात हलगर्जीपणाचा आरोप

नाशिक : शासकीय रुग्णालयांमध्ये अपुºया खाटा, खासगी रुग्णालयांची मनमर्जी, आरोग्य यंत्रणेकडून उपचारात होणारा हलगर्जीपणा यासह विविध तक्रारींचा शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाढा वाचला. नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी असून, अजूनही कोरोनावर उपचारासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे कोरोना आढावासाठी शासकीय अधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीस पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नाशिक महापालिका, जिल्हा पोलीसप्रमुख यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.भाजपच्या लोकप्रतिनिधींचा बहिष्कारविरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकींना उपस्थित राहू नये, असा फतवा महाआघाडी सरकारने काढल्यानंतर त्यांचे राजकीय पडसाद नाशिकमध्ये उमटले असून, शुक्रवारी (दि.२४) राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कोरोना आढावा बैठकीस भाजपच्या आमदार- खासदारांनी बहिष्कार टाकला.४केवळ विरोधीपक्षच नव्हे तर आमदार, खासदारांनी बोलविलेल्या बैठकांनादेखील उपस्थित राहू नका, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. हा आदेश लोकशाही विरोधी असून, आमदार खासदार लोकांचीच कामे करीत असतात. त्यांच्या बैठकांना गैरहजर राहण्याचे फर्मान काढणे चुकीचे आहे. परंतु महाआघाडी सरकारने असा आदेश काढल्याने निषेध म्हणून पवार यांच्या बैठकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या प्रदेश महामंत्री आणि आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारMLAआमदार