शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुष्काळी आढावा बैठकीत तक्र ारीचा पाढा

By admin | Updated: September 8, 2015 00:07 IST

येवला : उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश

येवला : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकर्‍यांनी आमदार छगन भुजबळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तालुक्यात ९0 टक्के खरीप पिके जळाली असून, जनावरांना चारा नाही तसेच पिण्यासाठी पाणी नाही, टँकर मागूनही वेळेवर मिळत नाही, जनावरे वाचवण्यासाठी किमान चारा-पाणी तरी द्या, अशी आर्त हाक शेतकर्‍यांनी यावेळी दिली.बैठकीत ३८ गाव पाणीपुरवठा समितीचे मोहन शेलार यांनी योजनेच्या साठवण तलावात केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी असल्याची माहिती दिली. ३८ गावांसह इतर गावांना पाणी देण्याचे त्यांनी मान्य केले. २२४ गावांतील ४५0 विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित कराव्यात, अशी सूचना जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड यांनी मंडली. या योजनेस तत्काळ हिरवा कंदील आमदार भुजबळ यांनी दिला.नगरसूलच्या १५ वस्त्यांवर केवळ एक टॅँकर पाणी वाटप करीत फिरतो. किमान दोन टॅँकरची आवश्यकता असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत तालुक्यातील शेतकर्‍यांचे नऊ कोटींचे थकीत अनुदान गेल्या तीन वर्षांपासून मिळाले नसल्याची तक्रार अँड. माणिकराव शिंदे यांनी केली. यावर सह. निबंधक जितेंद्र शेळके यांनी शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून अनुदान रखडले असल्याचे सांगितले. फळबाग अनुदानदेखील केवळ १0 टक्के मिळाले असून, ९0 टक्के अनुदान अद्याप मिळाले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली. चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. घरात आणि गावात अखंडित वीज देण्याची मागणी वसंत पवार यांनी केली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे दिलीप मेंगळ यांनी बाळापूर गावासाठी १५ दिवसांपूर्वी टॅँकर मागणी करूनही पाणी अद्याप मिळाले नाही अशी तक्र ार केली. याला मकरंद सोनवणे यांनी दुजोराही दिला. दरम्यान, अँड. माणिकराव शिंदे म्हणाले, सरकार तुमचे आहे. त्यासाठी तुम्ही पुढे व्हा, आंदोलन करा नाहीतर आम्ही १५ सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहोत. या बैठकीस अँड. माणिकराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, मुख्याधिकारी राहुल वाघ, जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, मकरंद सोनवणे, किशोर सोनवणे, सचिन कळमकर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या चालू असलेल्या पालखेडच्या पाणी आवर्तनानंतर धरणात पाणीसाठा नसल्याने पुन्हा पाणी आवर्तन मिळण्याची शक्यता नाही. यामुळे आहे त्या पाण्यात केवळ पिण्यासाठीच पाण्याचा उपयोग करावा. शेतीसाठी पाण्याचा उपसा होणार नाही याची दाखल घ्यावी, येसगाव पाणी योजना पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तत्काळ पाठवावा. पाणी वाया जाणार नाही यासाठी योजनांची काही दुरु स्ती असल्यास ती करावी. मराठवाडा १४ सप्टेंबरला, तर उत्तर महाराष्ट्र १५ सप्टेंबरला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य सरकारला कळावे म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. धरणाच्या भिंतीचे काम नंतर करू किमान मांजरपाड्याचा बोगदा मोकळा करा, यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असला तरी झारीतील शुक्राचार्य झारीत अडकले तर वेळप्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा आमदार भुजबळ यांनी दिला. (वार्ताहर)