शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:54 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना चौकशीचे साकडे घातले आहे.

ठळक मुद्देनिवेदन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे साकडे

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना चौकशीचे साकडे घातले आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टोकडे ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चौदावा वित्त आयोगाचा मिळालेला निधी तसेच आमदारांच्या विकासकामांच्या निधीतून कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जागेवर एकही काम अस्तित्वात दिसत नसल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने भगतसिंह सभा मंडप, संगणक कक्ष, चौक सुशोभीकरणाचे एकही काम झालेले नसताना लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात ३२६ शौचालये बांधून ३९ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना त्यापैकी फक्त ५० शौचालयांचा वापर सुरू असून, बºयाच शौचालयांना टाक्या नाहीत, काहींना दरवाजे व भांडेदेखील बसविण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोन दोन घरकुले वाटप करण्यात आले असून, गावात करण्यात आलेल्या पाइपलाइनमध्ये देखील गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात येऊनही दखल घेण्यात आलेली नाही. गावात बांधण्यात आलेल्या स्मशानभूमी कामाची अभियंत्यांमार्फत चौकशी करण्यात येऊन त्यात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आदेश देऊनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्षग्रामपंचायतीला पुन्हा नव्याने स्मशानभूमीची कामे करण्याचे आदेश देण्यात येऊनही ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले असून, या साºया कामांची पुन्हा चौकशी करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ सामूहिकपणे उपोषणास बसतील, असा इशारा विठोबा द्यानधान, वसंत शेजवळ, विजयसिंग डिंगर, नितीन सूमराव, जव्हारसिंग संगेडा, हेमंत फरस, नितीन डिंगर, सोपान सूमराव, भगवान रंगी आदींनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद