नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यापासून विस्कळीत झालेली जिल्ह्णातील सार्वजनिक वितरण प्रणाली अजूनही रुळावर येण्यास तयार नसून, आॅक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा उजाडत असताना अजूनही रेशन दुकानदारांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार केली जात असताना पुरवठा खात्याने मात्र महिना संपण्यापूर्वी सर्व दुकानदारांना रेशन मिळण्याचा दावा केला आहे.शासकीय धान्याची वाहतूक करण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने दर महिन्यासाठी मंजूर केले जाणाऱ्या रेशनसाठीच्या धान्याची वाहतूक पूर्ण होत नसल्याने धान्य व्यपगत (लॅप्स) होण्याचे प्रमाण कायम आहे. सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारे ३९९१ क्विंटल गहू व्यपगत झाल्याने ते धान्य अन्नधान्य महामंडळातून उचलण्यासाठी अनुमती मिळावी यासाठी शासनाची अनुमती मागण्यात आली, ती प्राप्त झाल्यामुळे १५ आॅक्टोबरपर्यंत सप्टेंबरचे धान्य उचलण्यास प्राधान्य देण्यात आले, मात्र त्याचवेळी आॅक्टोबर महिन्याचे धान्य उचलण्यास उशीर झाल्यामुळे दुकानदारांना अन्नपूर्णा, अंत्योदय व अन्नसुरक्षेचे गहू व तांदळाचा पुरवठा होऊ शकलेला नाही. एरव्ही महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रेशन दुकानात धान्य उपलब्ध होऊन त्याचे लाभेच्छुकांना वाटपही होत. मात्र आॅक्टोबर महिन्यात अद्यापही दुकानदारांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार केली जात आहे.
रेशन दुकानदारांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार
By admin | Updated: October 23, 2015 00:21 IST