शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार नाही : पतंगराव कदम

By admin | Updated: May 31, 2014 00:22 IST

नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़

नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़ नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीनंतर कदम पत्रकारांशी बोलत होते़ कदम म्हणाले, निवडणुकीतील पराभव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यनेतृत्वात बदल संभवत नाही़ मंत्रिमंडळ बदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, तो त्यांनी वापरावा़ जे काही होईल ते हायकमांडच्या आदेशाने होईल़ आपण काल दिल्लीला गेलो होतो; परंतु त्यापूर्वी राधाकृष्ण विखेपाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे़ त्यांच्या बैठकीत काय ठरले ते आपणास माहीत नाही़ मुळात दिवस थोडे असल्याने परिणामकारक व गतिमान कामे करण्याचा प्रयत्न आता होणे अपेक्षित आहे़ आपला निवडणुकीबद्दल कोणावरही रोष नाही़ जर निवडणुकीत कोणी काय केले असेल तर याची तपासणी नक्की होईल़ राज्य सहकारी बँकेच्या ऑडिट रिपोर्टबाबत विचारले असता, त्याबाबत आपणास काहीच माहिती नाही़ सहकार कायदा फ ार सक्षम. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर संपूर्ण संचालक मंडळ यास जबाबदार धरले जाते़ त्यात कोणी दोषी असतील तर त्यांची चौकशी होईल़कदम यांनी जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्वसन व वन विभागाच्या १०० कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला़ जे देशात घडले तेच पुण्यात चिरंजीव विश्वजित कदम यांच्या पराभवाबद्दल पतंगराव कदम यांना विचारले असता ते म्हणाले, जे संपूर्ण देशात झाले तेच पुण्यात झाले़ यामुळे कोणावर रोषही नाही़ विश्वजित कदम यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. आमची तयारी होऊ शकली नाही़ काही चुकीचे आरोपही झाले़ विश्वजित तरुणच असल्याने अजून त्यास खूप दिवस आहेत. त्यामुळे कसलीही चिंता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले़