मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 08:39 PM2021-03-05T20:39:14+5:302021-03-06T00:37:20+5:30

मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर येथील ज्येष्ठ नागरिकांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून गाऱ्हाणे मांडले आहे.

Complaining directly to the Prime Minister about the Manmad water leak | मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

Next
ठळक मुद्दे ज्येष्ठांचा पुढाकार : ह्यमन की बातह्णमधील मुद्यावर भर

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या भिंतीतून गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवर अकरा ठिकाणी पाणी गळती होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. शहरातील पाणी गळती थांबिवण्यात यावी, यासाठी येथील ज्येष्ठ नागिरक नागरी सुविधा संघर्ष समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने ८ फेब्रुवारी रोजी समितीच्या वतीने पालिका प्रवेशद्वार समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ही पालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही.
कार्यवाहीची मागणी
नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व पटवून जलसंधारणाचे आवाहन केले. प्रधानमंत्री पाण्याची एवढी काळजी घेतात तर पालिका अधिकारी का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करत समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणीही पंतप्रधानांना करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव एस. एम. भाले यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Complaining directly to the Prime Minister about the Manmad water leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.