शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:10 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते.

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते. मात्र यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असून, विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवर यावर्षी परिणाम झाला असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासोबच विविध तंत्रशिक्षण पदविका प्रवेशासाठीही अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी त्याच्या माध्यमिक शाला अथवा मार्गदर्शन केंद्रांमधून माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या आॅनलाइन अर्जभरून प्रक्रियेला वेग आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नाशिकमधून ९० टक्क्यांपासून ते १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी होते.मात्र यावर्षी निकालात मोठी घसरण झाली असल्याने अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या निकालापेक्षा घसरला असल्याने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शहरातील अकरावीच्या २३ हजार जागांसाठी २८ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. अशा स्थितीत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असल्याने शहरातील प्रमुख नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे.आॅनलाइन अर्जाची पडताळणीअकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय