शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी, जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:48 IST

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले आहे.

ठळक मुद्देवाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीतही वाढवाढत्या खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या अत्यल्प ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ कार्यक्रमात जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारतात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले. उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गंजमाळ येथे एक ह्यकोर्टाची पायरी चढण्याआधीह्ण या आगळ्या वेगळ्या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा आयोगाचे सचिव न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के आणि ज्येष्ठ वकील इंद्रायणी पटणी उपस्थित होते.जयंत जायभावे म्हणाले, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेचे मध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय उभय वकील आणि न्यायालये यांच्यावरील जबाबदारीचीही जायभावे यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली. न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के यांनी लोकन्यायालायचे महत्त्व विशद करून त्याबाबतच्या सर्व तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालायच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ वकील इंद्रायणी पटणी यांनी कोटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त करून कोटुंबिक न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे विशद केले. चर्चासत्रात राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकadvocateवकिलRotary Clubरोटरी क्लब