शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

गरजू कुटुंबीयांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:08 IST

आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ६ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रक क्रमांक ५३३नुसार सामुदायिक विवाह सोहळा समिती नाशिक जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यामधील नोंदणीकृत धार्मिक, सामाजिक सेवा संस्थांच्या २१ पंचांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी सहायक आयुक्त दीप्ती कोळपकर, के. एम. सोनवणे, समितीचे केशवअण्णा पाटील, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे उपस्थित होते. राज्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांच्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करण्यात येऊन या समितीद्वारे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ मे रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी १०१ तरुण-तरुणींचे प्रस्ताव अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अद्याप दहा लाखांचा निधी संकलित झाल्याची माहिती बेणी यांनी दिली. या विवाह सोहळ्यासाठी गरजू, गोरगरीब सर्वधर्मीय कुटुंबातील व्यक्ती कायद्यानुसार मुला-मुलींचे वय पूर्ण असल्यास नोंदणी करू शकतात, असे पंडित यांनी स्पष्ट केले. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, मुस्लीम अशा सर्वच धर्मांच्या परंपरेनुसार विवाह लावला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.प्रत्येक जोडप्याला अर्धा तोळे सोन्याचे मणी-मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू व किमान १०० वºहाडींची भोजनव्यवस्था करून दिली जाणार आहे. गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक