नाशिक (प्रतिनिधी)- शुक्ल-यजुर्वेदी ब्रााण संस्थेच्या वतीने ४१ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेदशास्त्री संपन्न भालचंद्र शौचे व सहकारी गुरुजींनी बटूंबर संस्कार केेले. श्री महंत रामप्रसाद शास्त्री, श्री महंत भक्तिचरणदासजी यांनी बटूंना आशीर्वाद दिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सुमन दीक्षित यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रभाकर वैद्य यांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. यावेळी विविध देणगीदारांचा सत्कारही करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष ॲड. भानुदास शौचे, माधवराव भणगे, मधुसूदन कुरूंभी, सौ. मेधावती साताळकर, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे आदि पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. फोटो स्कॅनला दिला आहे.
४१ बटूंचे सामुदायिक व्रतबंध
By admin | Updated: May 9, 2014 23:38 IST