शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:31 IST

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे संबंधित अधिकारी नाशिकमध्ये येऊनही त्यांचे जबाब न घेणाऱ्या पोलिसांनी मात्र झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे लक्ष मात्र भलतीकडे जबाबदार सोडून डॉक्टरांना नोटिसा

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे संबंधित अधिकारी नाशिकमध्ये येऊनही त्यांचे जबाब न घेणाऱ्या पोलिसांनी मात्र झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन गळती झाली, यात तत्काळ  २२ तर नंतर दोन अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने ऑक्सिजनटाक्या बसवूननंतर दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचे एका कंपनीला दिले आहे. तायो निपॉन या मूळ जपानी कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे. टाकी ३१ मार्च रोजी बसवल्यानंतर अवघ्या २१व्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ होते किंवा नाही आणि कंपनीने कोणाची नियुक्ती केली हे स्पष्ट झाले नाही. महापालिकेला दोन स्थानिक पुरवठादारांचे तंत्रज्ञ पाठवून गळती थांबवावी लागली होती.  या घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी कंपनीचे दोन अधिकारी शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये दाखल झाले. राज्य शासनाच्या वतीने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांची उत्तरे देण्याची पुरेशी तयारी नसल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्या आधारे उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, पोलीस दलाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ४८ तासांनी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची त्याचे जाबजबाब घेण्याऐवजी महापालिकेच्या डाॅक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मूळ जबाबदारी ठेकेदार कंपनीची असताना महापालिकेच्या डॉक्टरांना जाब जबाबासाठी बोलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तंत्रज्ञ तातडीने नियुक्त करासंबंधित ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने एक तंत्रज्ञ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालय येथे दोन ऑक्सिजन टाक्या असून, त्यांची दिवसभरात तीन ते चार वेळा तपासणी करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत.पोलीस पथक पुण्याला?ऑक्सिजन गळतीप्रकरणी नाशिकमध्ये आलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणा गाठू शकली नाही. आता अधिकाऱ्यांना जबाबासाठी नोटीस बजावायला खास पोलीस पथक पुणे येथे जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती