शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आयोगाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:36 IST

मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायतीसाठी सोमवारी मुदत : छाननीही लांबणीवरछाननीही लांबणीवर टाकली

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणा-या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन प्रत्यक्षात नामांकन दाखल करण्याची अंतीम मुदत समीप आलेली असताना राज्य निवडणूक आयोगाने आपल्या ‘गोंधळी’ कारभाराची पुन: प्रचिती दिली असून, निवडणूकीचे नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे राज्यभरातील उमेदवार व निवडणूक अधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उमेदवारांनी आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत दिली होती. १२ फेब्रुवारी रोजी छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतीम मुदत होती. मतदानासाठी २५ फेब्रुवारी व दुस-याच दिवशी मतमोजणी करून निवडणूक निकाल असा कार्यक्रम आयोगाने जाहीर करताना या निवडणुकीत राखीव जागांवर उमदेवारी करणा-या उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती, त्याचा परिणाम निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यात झाला होता. आयोगाच्या या लहरी फतव्यामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला व मंत्रीमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक अधिसुचनेत बदल केला. हे कमी की काय शनिवार दि. १० रोजी ग्रामपंचायतींचे नामांकन स्विकारण्याची अंतीम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री आपल्या निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरित्या बदल केला.नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून, दि. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन दुस-या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. आयोगाच्या या ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिका-यांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवारी सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक