शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 14:05 IST

नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि़२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले़ पोलीस दलाच्या परंपरेनुसार २१ आॅक्टोबर हा दिवस शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो़

ठळक मुद्देपोलीस स्मृतिदिन : देशभरातील ४१४ शहिदांचे स्मरण; पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि़२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले़ पोलीस दलाच्या परंपरेनुसार २१ आॅक्टोबर हा दिवस शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो़

शहर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना २०१७-१८ या कालावधीत शहीद झालेल्या देशभरातील ४१४ पोलीस अधिकारी - कर्मचाºयांना मानवंदना देण्यात आली़ या शहिदांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी कदम, गावडे व मडावी या तीन जवानांचा समावेश आहे़ सहायक पोलीस आयुक्त दीपक गि-हे व अजय देवरे यांनी शहीद पोलिसांच्या नावाचे वाचन केले़

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक अश्वती दोरजे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाºयांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले़ तत्पूर्वी पोलीस कर्मचाºयांनी शोकसंचलन केले़

यावेळी शहरातील मान्यवर तसेच पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह, पोलीस अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते़

महाराष्ट्रातील तीन पोलीस कर्मचारी शहीद

* शहीद पोलीस हवालदार सुरेश दयाराम गावडे - गडचिरोली येथे कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात झुंज देतांना गंभीर जखमी झालेले सुरेश गावडे हे शहीद झाले़ * शहीद पोलीस हवालदार सुनील दत्तात्रय कदम - ११ मे २०१८ रोजी ठाण्यातील एका पॉर्इंटवर उभे असताना तीन संशयित पळू लागल्याने त्यांचा पाठलाग करून मुकाबला करताना कदम शहीद झाले़ * शहीद पोलीस नाईक सतीश शरदराव मडावी - अमरावती येथे कार्यरत असलेले सतीश मडावी यांनी अवैध दारुभट्टीवर छापा टाकला़ यावेळी आरोपींनी कुºहाडीने केलेल्या हल्ल्यात मडावी शहीद झाले़

टॅग्स :Police Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिनNashikनाशिक