शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील खरिप हंगामातील कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:46 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील शेतकरीवर्गाची खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक संकटांशी दोन हात करत बळीराजाने यंदाचा हंमाग घेतला आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.

ठळक मुद्देदिलासा : कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील शेतकरीवर्गाची खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक संकटांशी दोन हात करत बळीराजाने यंदाचा हंमाग घेतला आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.रब्बी हंगामात आपल्याजवळील सर्व भांडवल खर्च करून बळीराजाने पिके घेतली. पिकांनी चांगली साथ दिल्याने शेतकरीवर्गाच्या अपेक्षा उंचावल्या. सुरुवातीच्या काळात काही पिकांनी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळून दिला. आता सुगीचे दिवस येतील, आपल्या कष्टाचा पूर्ण मोबदला मिळेल, अशी स्वप्ने रंगवण्यात शेतकरी दंग असातानाच अस्मानी व सुलतानी संकटांची मालिका सुरू झाली. यामुळे रब्बी हंगामातील शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागला.टामाटे फेकून द्यावे लागले. कष्टाने पिकवेल्या टमाट्याचा डोळ्यांसमोर लाल चिखल पाहावा लागला. कोथिंबीर शेतकऱ्यांना थोडाफार आधार दिला. तोपर्यंत द्राक्ष पीक तयार झाले.हंगामात झालेला तोटा भरून निघेल,या आशेवर बळीराजा बसला होता; मात्र या काळात कोरोना महामारी आली अन् सर्व लॉकडाऊन झाले. पिकवलेला शेतमाल शेतातच लॉक झाला. बाजार समित्या, वाहतूक बंद असल्याने भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला.या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. ज्यांच्या शेतात पाणी उपलब्ध आहे ते भाताला पाणी भरू शकतात; पण ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध नाही त्यांना भाताचे पीक नष्ट होताना पाहण्याची वेळ आली आहे.लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र सर्व दु:ख पचवत शेतकºयांनी पुन्हा जोमाने खरीप हंगामात उभारी घेतली आहे. यंदातरी कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकºयांनी बाळगली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी