शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयेही 30 जूनपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:23 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाविद्यालयांमधील प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज बंदच ठेवण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहे.

ठळक मुद्दे30 जूनपर्यंत कॉलेज कट्ट्यांवर शुकशुकाटच विद्यापीठाकडून तासिका सुरू न करण्याच्या सुचना

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाविद्यालयांमधील प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज बंदच ठेवण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये ३० जूनपर्यंत कोणत्याही तासिका अथवा शैक्षणिक कामकाज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सध्याच्या स्थितीचा विचार करून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील संभाव्य नियोजन शिक्षण विभागाला दिले आहे. त्यानुसार ३० जूनपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याबाबत विद्यापीठाकडून कळविले आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त सर्व परिसंस्था बंद राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्येही नियमित तासिका सुरू होण्यासाठी जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, त्यासाठी विद्यापीठावाही शासन निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने महाविद्यालये नियमित सुरू होण्याविषयी अद्यापही साशंकता आहे. या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी मुख्यालय न सोडता अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजाकरिता आदेशानुसार कार्यालयामध्ये उपस्थित रहावे. इतर सर्व सेवकांनी घरी राहून वर्क फ्रॉम होम कार्यालयीन कामकाज पहावे. यासंदर्भात शासनाचे अथवा सक्षम प्राधिकरणाचे काही वेगळे आदेश प्राप्त झाल्यास त्यासंदर्भात स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक विभागातील कार्यालये तसेच नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकाजाबाबतही विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी