शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्ता सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:04 IST

विद्यापीठाच्या पदवी अंतीमपूर्व परीक्षा रद्द करून उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा व अंतर्गत गुणांच्या गणितीय सुत्राच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. परंतु, त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सुर उमटल्याने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी स्वतंत्र परीक्षेचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देहिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी स्वतंत्र परीक्षेचे नियोजनगुणवत्ता सुधारण्यासाठी अर्ज करण्याचे अवाहन

नाशिक : कोविड-१९ महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या पदवी अंतीमपूर्व परीक्षा रद्द करून उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा व अंतर्गत गुणांच्या गणितीय सुत्राच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. परंतु, त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सुर उमटल्याने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी स्वतंत्र परीक्षेचे नियोजन केले असून त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे अवाहन केले आहे.विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन, परीक्षांचे आयोजन व निकाल जाहीर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रथम वर्ष ते अंतीमपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. परंतु, विद्यापीठाच्या परीपत्रकानुसार जुलै २०२० परीक्षेच्या निकालानंतरही ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील सत्रात गुणवत्ता सुधार करण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेच्या विषयांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतंत्ररीत्या हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना २०२० च्या परीक्षेचे अर्ज भरण्याची  संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.    

परीक्षा अर्ज भरण्याची मूदत गुणवत्ता सुधारण्यााठी ३१ जुलै २०२० पर्यंत ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. तर ज्या परीक्षांचे निकाल ५ ऑगस्टनंतर जाहीर करण्यात येणार आहेत, त्यांच्यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून पुढील दहा दिवसांमध्ये अर्ज सादर करण्याची मूदत राहणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२० च्या परीक्षेचे अर्ज भरलेले आहेत व विद्यार्थ्यांच्या ज्या विषयांना गणितीय सुत्राचा वापर करून गुण प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याच विषयांना गुणवत्ता सुधारण्याची संधी मिळणार आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी नियोजित परीक्षेचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. उन्हाळी २०२० परीक्षेसाठी पहिल्यांदाच अर्ज करणाºया विद्यार्थ्यांचे गुणदान गणितीय सुत्रानुसार करण्यात आलेले आहे, केवळ अशाच विद्यार्थ्यांना कमीत कमी एक व जास्तीत जास्त सर्व लेखी परीक्षेच्या विषयांसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धी परीपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठexamपरीक्षा