देवगाव : श्रीरामजन्म भूमी अयोध्येत होत असलेल्या श्री राममंदिर उभारणीचा भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत निफाड तालुक्यातील देवगाव येथे उत्सव साजरा करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवगाव येथील श्री मारोती मंदिर येथे सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून मास्कचा वापर करत महापूजा करण्यात आली, सामुदायिक महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील घरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या तर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.या वेळी किरण कुलकर्णी, सोमनाथ मेमाने, दिगंबर सोमवंशी, जयवंत लोहारकर, अनिल बोचरे, संतोष हुजबंद, लहानु मेमाने, धनजंय जोशी, भागवत बोचरे, निखिल चव्हाण, सतिष लोहारकर, प्रल्हाद गोसावी, संतोष चव्हाण, बबन पिगंट आदीसह हनुमान मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
देवगावात सामूहिक महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:50 IST
देवगाव : श्रीरामजन्म भूमी अयोध्येत होत असलेल्या श्री राममंदिर उभारणीचा भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत निफाड तालुक्यातील देवगाव येथे उत्सव साजरा करण्यात आला.
देवगावात सामूहिक महाआरती
ठळक मुद्देघरोघरी गुढी उभारून उत्सव : महाप्रसादाचे वाटप