नाशिक : स्टेप फाउंडेशनच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील फेरी मार्गावर ‘एक फेरी स्वच्छतेसाठी, एक फेरी आरोग्यासाठी, एक फेरी निसर्ग संवर्धनासाठी’ या उपक्र मांतर्गत कचरा संकलन व स्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या उपक्र मात तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.संस्थेमार्फत फेरी मार्गावर असणाºया कचºयाचे संकलन करण्यात आले. त्यात रिकाम्या पाण्याच्या बॉटल, वेफर्स व बिस्किट पुड्यांचे रॅपर्स, कागदी पिशव्या इत्यादींचे अंदाजे ३०० ते ५०० किलो कचºयाचे संकलन झाले. संकलित केलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आलेल्या भाविकांना कापडी पिशव्यांचा वापर करावा, फेरीला जाताना रस्त्यावर कचरा टाकू नये, पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.या उपक्रमात गोकुळ मेदगे, दीपक देवरे, सचिन शेळके, विश्वजित पाटील, रोशन मेदगे, आकाश काळे, प्रतीक शिंदे, योगेश पाटील, विक्र म बिडवे तसेच फेरीसाठी आलेले भाविक, पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
स्टेप फाउंडेशनतर्फे ब्रह्मगिरी फेरीमार्गातील कचऱ्याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 19:09 IST
स्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन
स्टेप फाउंडेशनतर्फे ब्रह्मगिरी फेरीमार्गातील कचऱ्याचे संकलन
ठळक मुद्देस्वच्छता फेरीत जवळपास ५०० किलो कचऱ्याचे संकलन