शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

कोरोना संसर्ग काळात ४१४ रक्तपिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:02 IST

सिन्नर :रुग्णांसाठी रक्ताची गरज असल्याचा फोन जिल्हा रुग्णालयातून आला अन् 24 तासातच 93 रक्तपिशव्यांचे संकलन करून मदत पोहोचती करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्रित येत कोरोना संसर्ग काळात आत्तापर्यंत एकुण 414 रक्त पिशव्यांची मदत केली आहे.

ठळक मुद्दे विविध शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन

सिन्नर :रुग्णांसाठी रक्ताची गरज असल्याचा फोन जिल्हा रुग्णालयातून आला अन् 24 तासातच 93 रक्तपिशव्यांचे संकलन करून मदत पोहोचती करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्रित येत कोरोना संसर्ग काळात आत्तापर्यंत एकुण 414 रक्त पिशव्यांची मदत केली आहे.कोरोना संसर्गामुळे रक्त तुटवडा निर्माण होत असून जिल्हा रुग्णालयासह रक्तपेढ्या कडून रक्तदानासाठी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले जात आहे. विविध शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले जात आहे.जिल्हा रुग्णालयात रक्ताची गरज असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना कळवले. त्यांनी लगेचच नगरसेवक पंकज मोरे व शिवसेना पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या. सिन्नरला कडकडीत लॉकडाऊन होता त्या काळात बजरंग व शिवालय मंडळाच्या सहकार्याने शहरा जवळच सरदवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शिबिराचे आयोजन करून कार्यकर्त्यांसह नागरिकांना रक्त दान करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयातील 20 जणांचे पथकही लगेच दाखल झाले. अल्प काळातही 93 दात्यांनी रक्तदान केले. गरजेच्या वेळी रक्तपुरवठा झाल्याने जगदाळे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. माजी आमदार वाजे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पाच शिबिरांद्वारे 414 रक्तपिशव्या यांचे संकलनकोरोना संसर्गामुळे रक्ताचा तुटवडा असून त्यामुळे रुग्णांवरील शस्त्रक्रियाही पुढे ढकलाव्या लागत आहेत. रक्ताची वेळेत गरज पूर्ण न झाल्यास त्यांच्या जीवितासही धोका पोहोचू शकतो. अशा स्थितीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातून रक्त तुटवडा असल्याची माहिती मिळताच पाच वेळा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडिया वरून कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीतून आत्तापर्यंत 414 रस्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.चौकट-थॅलेसेमिया रुग्णांना मिळाले जीवदानथॅलेसेमिया रुग्णांना 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त तुटवडा भासत असल्याने थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष मदत म्हणून शिवसेना कार्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी 114 जणांनी रक्तदान करून थॅलॅसिमिया रुग्णांना जीवदान दिले.रक्त संकलनात सिन्नरकरांच्या होत असलेल्या मदतीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून आभार मानले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBlood Bankरक्तपेढी