शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा जोर कायम ;  पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:02 IST

किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.मागील वर्षी डिसेंबरअखेर ७.५ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. यावर्षी सोमवारी ८.५ अंश इतकी नोंद झाली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारी पारा थेट आठ अंशांपर्यंत खाली आल्याने नाशिककर चांगलेच गारठले. पहाटेपासून दुपारपर्यंत नाशिककरांना हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरुवात होत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशांच्या आसपास स्थिरावत आहे. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे.  उत्तर भारतात थंडीने कहर केल्याने उत्तर महाराष्टतील वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवत आहे.तीन दिवसांपासून गारठामागील तीन दिवसांपासून पारा अधिक घसरू लागला आहे. थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी नाशिककरांना पुढील दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात जळगावनंतर मंगळवारी नाशिक हे सर्वाधिक थंडीने गारठलेले शहर होते. जळगावमध्ये ९ अंश तर नाशकात ९.५ अंश इतके तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणNashikनाशिक