शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

थंडीचा प्रचंड जोर : पारा ७.९ अंशापर्यंत घसरला; नीचांकी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 13:51 IST

एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्दे ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर नाशिकमधील निफाड तालुक्यात.निफाड तालुक्यात किमान तपमान बुधवारी ६.६

नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा घसरण्यास सुरूवात झाली. पारा सुरूवातीला हळुहळु घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ९.५ अंशावरून थेट ७.९ अंशापर्यंत खाली घसरला. एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.गेल्या सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारपासून पारा अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरल्यानंतर उत्तर महाराष्टÑदेखील थंडीने प्रभावित झालेला पहावयास मिळत आहे. सोमवारपासून पारा झपाट्याने खाली आल्याने नाशिककर गारठले आहे. दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीचा कडाका वाढताच शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले आहेत. एकूणच वाढत्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. हाडं गोठविणारी थंडी सध्या नाशिककर अनुभवत आहेत. बुधवारी तर थंडीने कहरच केला. मंगळवारी रात्रीपासूनच थंड वारे अधिक वेगाने वाहण्यास सुरूवात झाल्यामुळे बुधवारी पहाटे थंडीने हाहाकार उडवून दिला. पारा थेट ७.९अंशापर्यंत खाली घसरला. वाढत्या थंडीच्या कडाक्याने बुधवारी सकाळी जॉगिंगट्रॅकवरील गर्र्दी ओसरल्याचे चित्र होते तर अनेकांनी जीमला ही दांडी मारली. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये पटसंख्याही कमी जाणवली. सकाळी चिमुकल्यांनी थंडीच्या कडाक्यामुळे शाळा, क्लासला जाण्यासाठी कंटाळा करत दांडी मारण्याकडे कल दिला. तर काही पालकांनी आपल्या चिमुकल्यांना थंडीपासून संरक्षणासाठी संपुर्णत: उबदार कपड्यांचे कवच घालून शाळेत पाठविले.---राज्यातील ही शहरे गारठलीराज्यात सर्वाधिक कमी किमान तपमान बुधवारी अहमदनगरमध्ये ७.२ अंश इतके नोंदविले गेले. नाशिक -७.९-निफाड-६.६, जळगाव ९.४, पूणे -९.३, नागपूर- ९.६, महाबळेश्वर- १०.१, सातारा १३.२ या शहरांमध्ये थंडीने कहर केला असून नागरिक गारठले आहेत. राज्यात अहमदनगर हे सर्वाधिक थंड असलेले शहर ठरले तर नाशिक दुस-या क्रमांकावर आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील हवामान केंद्राने ६.६ इतके किमान तपमान सकाळी मोजल्यामुळे राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर नाशिकमधील निफाड तालुक्यात असल्याचे स्पष्ट होते.---नाशिकचे आठवडाभरातील किमान तपमान असेबुधवारी (दि.१२) - ९.६गुरूवारी (दि.१३) - ११.०शुक्रवारी (दि.१४) - १०.४शनिवारी (दि.१५) - १०.६रविवार (दि.१६) - १०.५सोमवार (दि.१७) - ८.५मंगळवार (दि.१८) - ९.५बुधवार (दि.१९)- ७.९

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान