शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

शहरात थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:12 IST

आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती.

ठळक मुद्देपारा ९.३ अंशांवर : बोचऱ्या थंड वाºयामुळे वातावरणात गारठा

नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती.बुधवारी पारा अचानकपणे ९.५ अंशांवरून थेट ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका अधिक आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील शहरांवरही होऊ लागला आहे. मागील दहा दिवसांपासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारपासून पारा अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. दिवसभर नागरिकांना बोचºया थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीचा कडाका वाढताच शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले आहेत. एकूणच वाढत्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी थंडीपासून नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला होता. पहाटेही थंडीची तीव्रता चांगलीच होती. यामुळे उबदार कपडे परिधान करून चाकरमान्यांनी कार्यालयात वावरणे पसंत केले. आठवडाभरापासून वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांनी सध्या पंखे, वातानुकूलित यंत्रांना सुटी दिली आहे.गुरुवारी राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान अहमदनगरमध्ये ६.४ इतके नोंदविले गेले. औरंगाबाद ८.०, नागपूर ८.६, पुण्यात ८.८, जळगाव ९.०, परभणी ९.९, चंद्रपूर १०.२, सातारा १०.९, उस्मानाबाद १०.२, बुलढाणा १०.८ इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यातील या शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान