शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थंड अन् हरित नाशिकचा पारा पोहचला ४१ अंशपार; एप्रिल ठरला तापदायक 

By अझहर शेख | Updated: April 28, 2024 21:39 IST

सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले.

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये यंदाचा एप्रिल महिना नाशिककरांसाठी तापदायक ठरला आहे. एप्रिलअखेर दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला. हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान रविवारी (दि.२८) शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठरोडवरील हवामान केंद्रात नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना दिवसभर प्रखर उन्हाचा चटका जाणवल्याने झळा असह्य झाल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले.पंधरवड्यापूर्वी मंगळवारी (दि.१६) सायंकाळी नाशिक शहरात कमाल तापमानाचा पारा थेट ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. यापेक्षा जास्त कमाल तापमान आतापर्यंत नोंदविले गेले नव्हते. त्यावेळी सलग चार दिवस कमाल तापमान हे ४० पार स्थिरावत होते. रविवारी कमाल तापमान ४१ अंशाच्याही पुढे सरकले. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरातसुद्धा नागरिकांना उष्मा जाणवत होता. किमान तापमानदेखील २४ अंशापुढे सरकल्यामुळे नाशिककरांना रात्रदेखील ‘हॉट’ झाली आहे. यंदा एप्रिलअखेर दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककर करत आहेत. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठाही रविवारी ओस पडल्याचे चित्र होते. रात्रीसुद्धा नाशिककरांना फुटतोय घाम कमाल तापमानासोबत किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. यामुळे नाशिककरांना रात्रीसुद्धा घरात घाम फुटत आहे. दोन्ही प्रकारच्या तापमानाचा आलेख चढता राहिल्याने नागरिकांना यंदा उन्हाच्या झळा असह्य हाेऊ लागल्या आहेत. ‘ते’ चार दिवस होते चाळिशीचे... १५ ते १८ एप्रिल हे चार दिवस नाशिककरांसाठी उष्णतेच्या लाटेचे होते. ४०.४ ते ४०.७च्या दरम्यान कमाल तापमान या चार दिवसांत नोंदविले गेले होते. तसेच किमान तापमान २२ ते २४.५ अंशापर्यंत स्थिरावले होते. हे चार दिवस नाशिककरांसाठी चांगलेच तापदायक ठरले होते. आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

टॅग्स :TemperatureतापमानNashikनाशिक