शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

कुलाबा वेधशाळा : ‘ओखी’अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात; तीव्रता होणार कमी; मध्यरात्री धडकणार सुरतेत

By azhar.sheikh | Updated: December 5, 2017 21:52 IST

मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नयेमध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून सुरू झालेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा कमी होत जाणार आहे. कारण हे वादळ अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचले आहे. मध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार असून पुढे वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सुत्रांनी सांगितले.मागील चार ते पाच दिवसांपासून ओखी या चक्रीवादळाने भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर थैमान घालत गुजरातकडे मोर्चा वळविला. या वादळाने दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडूसह आदि राज्यांना मोठा तडाखा दिला. ‘ओखी’च्या वाढत्या तीव्रतेमुळे सोमवारपासून मुंबईत संध्याकाळी पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी पहाटेपासून उत्तर कोकणासह पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वा-याचा वेगही सरासरीपेक्षा वाढल्याचे निरिक्षण हवामान खात्याकडून नोंदविले गेले. मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

--‘ओखी’ एक दृष्टिक्षेपात...बांग्लादेशाने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले. बंगाली भाषेत या शब्दाचा अर्थ डोळा होतो. हिंदी महासागर अर्थात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ असे म्हणतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन झालेल्या भौगोलिक स्थितीचे चक्रीवादळात रुपांतर झाले. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीवसह आठ देशांनी नावे ठरविली आहेत. भारताकडून चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना असतो ते सर्व देश एकत्र येऊन नावे सुुचवितात. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. ‘ओखी’चे पुढील नाव ‘सागर’ असेल व ते भारताकडून दिले जाईल.

--शेतक-यांसाठी दिलासा; खबरदारी गरजेचीओखी वादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही; मात्र नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत सोसाट्याचा वारा किंवा गारपिटीची शक्यता अजिबात नसल्याचा, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेती