अखेरच्या सेवेसाठी शवपेटी, निफाड ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:07 PM2019-12-04T13:07:56+5:302019-12-04T13:10:35+5:30

निफाड : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे . मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेवावा लागतो या कालखंडात मृतदेह व्यवस्थित राहावा या हेतूने निफाडकर ग्रामस्थांनी शवपेटीची व्यवस्था केली आहे.

 Coffin for last service, Nifad villagers' social commitment | अखेरच्या सेवेसाठी शवपेटी, निफाड ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी

अखेरच्या सेवेसाठी शवपेटी, निफाड ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी

Next

निफाड : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे . मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेवावा लागतो या कालखंडात मृतदेह व्यवस्थित राहावा या हेतूने निफाडकर ग्रामस्थांनी शवपेटीची व्यवस्था केली आहे. यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली भागाचे प्रचंड नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निफाडमधील सर्व युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था एकत्र आल्या. सर्वांनी या पूरग्रस्तांना अगदी भरपूर मदत करून सामाजिक जाणीव जपली. पूरग्रस्तांसाठी जमलेल्या निधींपैकी काही निधी शिल्लक होता. या रकमेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग व्हावा म्हणून निफाडच्या सर्व नागरिकांच्या चर्चेतून निफाडसाठी एक शवपेटी विकत घेण्याचे ठरले. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला.
निफाडमधील सर्व सामाजिक संस्था, विविध युवक मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या समन्वयाने एक शवपेटी खरेदी करून औपचारिक सेवेत दाखल झाली. एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला व मृतदेह रात्रभर ठेवण्याची वेळ येईल तेव्हा त्या कुटुंबाच्या मागणीनुसार ही शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी राबविलेले उपक्र म निश्चितच प्रेरणादायी असतात. निफाड गावातील नागरिकांनी सदर कार्यात सहभाग घेत सामाजिक जाणीव जपली.

Web Title:  Coffin for last service, Nifad villagers' social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक