शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:33 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेत थोडा बदल करून त्यात सहकारी गृह निर्माण संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेमागचा हेतू म्हणजे कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थ दूर करणे, कृषी मालाला रास्त दर मिळवून देण्याचा आहे. सध्या शेतकºयाचा माल बाजार समितीशिवाय अन्य ठिकाणी विकला जात नाही किंबहुना त्याने उत्पादित केलेला सर्वच माल बाजार समिती वगळता कोणी घेतही नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याने त्यावर सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमध्येच शेतकºयांच्या मालाची विक्री व्यवस्थेची साखळी उभारून दोन्ही घटकांचा त्यात लाभ होणार असल्याचे पणन महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतमाल तयार करणारे घटक, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट अशा सर्वांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.वेळ, खर्चाची बचत होणारसोसायटीच्या आवारातच शॉप उभारून स्वस्त दरात सभासद सदस्यांना ताजा माल उपलब्ध करून त्यातून मिळणाºया उत्पादनातून शॉपचा खर्च भागविणे शक्य आहे. त्यासाठी सोसायटीत किमान शंभर स्क्वेअर फूट शॉप उभारणे गरजेचे असून, संस्थेने आॅर्डर दिल्याप्रमाणे संबंधित उत्पादक घरपोहोच माल पुरवतील व तो स्वस्त दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पादकाला हक्काचा ग्राहक मिळेल व ग्राहकालाही दाराशीच स्वस्त दरात ताजा माल मिळून वेळ व खर्चात बचत होणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार