शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात आता सीएनजी गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:10 IST

केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत.

नाशिक : केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. औद्योगिक भागाला आणि घरातील एलपीजी गॅसला स्वस्त पर्याय ठरू शकणारा घरगुती गॅसदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि.२२) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथून करणार आहेत.  महाराष्टÑ नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने बुधवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत ही माहिती स्वतंत्र संचालक राजेश पांडे तसेच व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी दिली. यावेळी सुजीत रूईकर, मयूरेश गानू, सचिन काळे आदी अधिकारी उपस्थित होते.देशातील पारंपरिक क्रुड आॅइलचा वापर कमी व्हावा यासाठी स्वच्छ नैसर्गिक गॅसला प्रोत्साहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून नवव्या टप्प्यात १७४ शहरात सीएनजी गॅस वितरण सुरू करण्यात येणार आहे. महाराष्टÑ नॅचरल गॅसच्या माध्यमातून नाशिक, धुळे आणि औरंगाबाद येथे आता गॅस पुरवठा केला जाणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी सर्वेक्षण सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी सुरू होईल. नाशिकसाठी पालघर येथून शंभर किलोमीटर गॅसवाहिनी टाकण्यात येणार असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल; परंतु तत्पूर्वी नाशिक शहरात चाळीस ते पन्नास ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी टॅँकरने गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच मोटारींसाठी सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे.देशभरात दीड हजार सीएनजी पंप असून, ३२ लाख वाहने त्यावर चालतात. याशिवाय घरगुती गॅस पुरवठ्यासाठी थेट पाइपलाइनचा वापर केला जातो आणि गॅसमीटरच्या माध्यमातून बिलिंग केले जाते. घरगुती गॅसवर जनरेटर आणि एसीदेखील चालविला जातो. उद्योग आणि रिक्षासारख्या वाहनांसाठीदेखील हा स्वस्तातील पर्याय आहे.पेट्रोलपेक्षा स्वस्तसध्या पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालले आहे. त्यामुळे इंधन वापराबाबत अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ३५ टक्के हे इंधन स्वस्त आहे. शिवाय पर्यावरणपूरक असून, वाहनांना जादा माईलेज मिळतो. घरगुती गॅसदेखील स्वस्त असून, अनुदानीत सिलिंडर साडेपाचशे रुपयांपर्यंत जाते तर सीएनजी साडेतीनशे रुपयांत पडतो.

टॅग्स :NashikनाशिकFuel Hikeइंधन दरवाढPetrol Pumpपेट्रोल पंप