शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मुख्यमंत्र्यांकडून कॅबिनेट मंत्र्यांची पाठराखण

By admin | Updated: February 11, 2015 23:40 IST

जादा अधिकार : तोडगा काढण्याचे संकेत

नाशिक : राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून सेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देताना डावलले जात असल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्र्यांची बाजू घेतली. राज्यमंत्र्यांना किती अधिकार द्यायचे याचा निर्णय कॅबिनेट मंत्री घेतील, असे सूतोवाच करून सेनेच्या राज्यमंत्र्यांची मागणीही त्यांनी फेटाळून लावली. मात्र, राज्यमंत्र्यांना जादा अधिकार देण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने वादावर समन्वयाने तोडगा काढला जाईल, असेही ते म्हणाले. (पान ७ वर)महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत कॅबिनेट व राज्यमंत्र्यांचे अधिकार वाटपाच्या तक्रारींबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कॅबिनेट मंत्री हे राज्यमंत्र्यांना अधिकार देत असतात़ तसेच मंत्रिमंडळात भाजपाचे कॅबिनेट मंत्री, तर शिवसेनेचे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे कॅबिनेट, तर भाजपाचे राज्यमंत्री आहेत़ या दोघांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून प्रश्न उभा राहिला, तर तो दूर केला जातो़ तसेच या दोघांनीच आपल्यामध्ये अधिकारांचे वाटप करावयाचे असते़ तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जशी अन्यायाची भावना आहे तशीच भावना भाजपाच्या राज्यमंत्र्यांमध्येही आहे़ यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अधिकार हे मंत्र्यांचे असतात. त्यातील किती अधिकार राज्यमंत्र्याला द्यावयाचे हा त्या मंत्र्याचा अधिकार असतो़ मंत्रिमंडळातील सर्वच राज्यमंत्र्यांना अधिकार मिळालेले आहेत़ मात्र, काहींना जादा अधिकार हवे असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे़ शेवटी राज्यमंत्र्यांकडे कोणकोणते अधिकार द्यायचे हे मंत्री ठरवतात व त्यानुसार मंत्र्यांनी ते अधिकार राज्यमंत्र्यांकडे दिले आहेत़ याव्यतिरिक्त आणखीण काही अधिकार मिळावेत, अशी काही राज्यमंत्र्यांची अपेक्षा असून, ते मंत्री आणि राज्यमंत्री आपसात बसून समन्वयाने सोडवतील, असेही ते म्हणाले़(प्रतिनिधी)पंतप्रधानांचा बारामती दौरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मतदारसंघातील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी व उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद मोदी जाणार आहेत़ काँग्रेस व इतर पक्षांशी आमचे राजकीय मतभेद असले तरी राजकीय अपृश्यता नाही़ तसेच हा प्रकल्प भारत सरकारचा आहे़.