शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष पंढरीवर दाटले संकटाचे ढग ; फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:55 IST

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात ठराविक अंतराने कोसळणाºया पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने  द्राक्षबागायतदारांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा मोठा फटका बसला आहे.संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यातील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक  अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर ऑक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्याने नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताक्रात झाला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी