शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दोन नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:04 IST

शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली.

नाशिक : शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली.  महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांद्वारे गेली अनेक वर्षे शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संस्थाचालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रभावित करणाºया समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला राज्यातील शाळा बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील ७० ते ७५ शिक्षण संस्थांच्या शाळा बंद राहणार आहेत. परंतु, अनेक मोठ्या संघटना या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता आहे. मोठ्या शिक्षणसंस्थांनी सरकारी हस्तक्षेपातून जवळपास ६३४ शिक्षकांची नियुक्ती करून घेतली आहे, त्यामुळे अशा संस्था सरकारच्या दबावाला बळी पडत असून, त्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील, रामराव मोरे, केशव पाटील, प्रभाकर धात्रक, विजय काळे, सोमनाथ चौधरी, प्रवीण जोशी, गणपत मुठाळ, सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते.बेमुदत आंदोलनाचा इशाराशिक्षण संस्थाचालकांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने वारंवार पाठपुरा करूनही सरकारक डून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही सरकारने संस्थाचालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही संस्थाचालकांनी यावेळी दिला.

टॅग्स :SchoolशाळाStrikeसंप