शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने लागू केलेली  कर सवलत योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:24 IST

नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास त्यासाठी मिळणारी अर्धा टक्का सवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना बिलानुसार घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे.

नाशिक : नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास त्यासाठी मिळणारी अर्धा टक्का सवलतही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना बिलानुसार घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी घरपट्टीची देयके ही साधारणपणे आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधित वितरित केली जायची. त्यानंतर मिळकतधारकांकडून त्यानुसार भरणा व्हायचा. डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनीमिळकतधारकांकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच घरपट्टीची बिले भरली जावीत यासाठी सवलत योजना लागू केली होती. त्यानुसार एप्रिल महिन्यात घरपट्टीचे देयक भरल्यास त्यासाठी ५ टक्के, मे महिन्यात ३ टक्के तर जून महिन्यात २ टक्के सवलत दिली जायची. याशिवाय घरपट्टीच्या देयकाचा आॅनलाइन भरणा केल्यास त्यासाठी १ टक्का तर पाणीपट्टीसाठी अर्धा टक्का सवलत दिली जायची. डॉ. गेडाम यांनी लागू केलेल्या सवलत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीनच महिन्यांत महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये जमा व्हायचे. याशिवाय, सवलत योजनेमुळे नागरिकांकडूनही घरपट्टी बिले भरण्याबाबत उत्सुकता दाखविली जायची. मात्र, मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सदर सवलत योजना गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मिळकतधारकांना घरपट्टी-पाणीपट्टीची पूर्ण देयके भरावी लागणार आहेत. गेडाम यांनी लागू केलेली योजना अभिषेक कृष्ण यांनीही पुढे चालू ठेवली होती.सौर ऊर्जेवरील  सवलत कायमआयुक्तांनी घरपट्टी-पाणीपट्टी भरणा करण्यासाठी लागू करण्यात आलेली सवलत योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या मिळकतधारकांसाठी मात्र ५ टक्के सवलतीची योजना कायम ठेवली आहे. आतापर्यंत सौर ऊर्जा वापर करणाºया मिळकतधारकांनी एप्रिलमध्ये घरपट्टीचा आॅनलाइन भरणा केल्यास तब्बल ११ टक्के बिलात सवलत मिळत होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका