शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम बक्षीस योजनेतून घंटागाडी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:29 IST

तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देविंचूरदळवी : स्वच्छता कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून देखभाल

विंचूरदळवी : तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. घंटागाडीच्या माध्यमातून गावात आता नियमित कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी विशेष स्वच्छता कर म्हणून ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाकाठी २०० रूपये रक्कम आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली.विशेष स्वच्छता कराच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम घंटागाडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी वापरली जाणार आहे. याप्रसंगी सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे, सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्तात्रय दळवी, बहिरु दळवी, निर्मला दळवी, भारती दळवी, विमल दळवी, सविता बर्वे, सुनीता भोर, विश्राम पाटील शेळके, संपत चंद्रे, शिवाजी दळवी, युवराज भोर, भाऊसाहेब दळवी, गोरख भोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.पुरस्कारात तालुक्यात अव्वल २०१७-१८ सालीच्या स्मार्टग्रामपुरस्कार योजनेत स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या विषयावर गुणदान करण्यात आले. त्यात विंचूरदळवी ग्रामपंचायतीने १०० पैकी ७९ गुण मिळवून तालुकास्तरावर प्रथम क्र मांक पटकाविला. या पुरस्कारापोटी ग्रामपंचायतीस ८ लाख ३५ हजार ५०० रूपयांचे बक्षीस प्राप्त झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने निविदा काढून ट्रॅक्टर व ट्रॉलीची खरेदी करून घंटागाडीचा उपक्र म सुरू केला.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य