शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 10:54 PM

इगतपुरी : समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . ३ या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य ...

ठळक मुद्देतत्वत: मान्यता : नाशिक-मुंबई अंतर होणार कमी

इगतपुरी : समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . ३ या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रु पयांच्या खर्चाला तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सहा पदरी उड्डाण पुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक ते मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.समृद्धी महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून वेगाने सुरु आहे. नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . तीन आणि समृद्धी महामार्ग या दोनही महामार्गांमध्ये अंतर असल्याने प्रवाशांना कनेक्टीव्हीटीची मोठी अडचण होत होती. दोनही महामार्ग पिंप्री सदो शिवारापासून अगदी जवळ आहेत. या दोन महामार्गांची जोडणी नसल्याने याठिकाणी सतत वाहतूक ठप्प होत असते. तसेच या ठिकाणी रोजच अनेक लहान- मोठे अपघात होत असतात. समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग यांना जोडणाऱ्या पिंप्री सदो शिवारात उड्डाणपुल व्हावा, अशी मागणी होत होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पिंप्री सदो शिवारात या उड्डाण पुलाला जानेवारी महिन्यात मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपुलाच्या कामासाठी ४८ कोटी रु पयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. यापैकी १० कोटी रु पये नॅशनल हायवे तर उर्विरत ३८ कोटी रु पये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ देणार आहे. या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असणार असून तो सहा पदरी असणार आहे.गोंदे पर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्तावही लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार असून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.- हेमंत गोडसे, खासदार

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग