शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीसाठी पुणेगाव कालव्याची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:25 IST

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.

येवला : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.  माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मागील आठवड्यात मतदारसंघातील काही भागाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी विखरणी येथे जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या होत्या. याप्रसंगी पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला तर पूरपाण्याने या कालव्याची चाचणी घेण्याचे छगन भुजबळ यांनी चाचणीपूर्वी कालव्यातील अडथळे दूर करण्यात यावे अशी मागणी संबंधित विभागाकडे केली होती. या मागणीला साद घालत संबंधित विभागाने कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला तत्काळ सुरुवात केल्याची माहिती सहायक बाळासाहेब लोखंडे व पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी दिली आहे.  या कालव्यात मोठमोठे दगड व माती साठली असून, त्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊ शकतो तसेच या मोठमोठ्या अडथळ्यांमधून पाणी पुढे जाऊ शकणार नाही. तरी सदर कालवा स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही या पत्रान्वये आमदार भुजबळ यांनी केली होती. कालवा प्रशासनाने या पत्राची तत्काळ दखल घेत कालवा सफाईला सुरुवात केली असून, पुणेगाव ते दरसवाडी या ६३ किमी अंतरापैकी २८ ते ६३ किमी दरम्यान कालव्यातील अडथळे तसेच सफाईचे काम सुरू करण्यात आले असून, दरसवाडी ते बाळापूर दरम्यान काम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहितीही मोहन शेलार यांनी दिली आहे. गेल्या वर्षी कालव्याची चाचणी घेण्यात यावी या मागणीसाठी मोहन शेलार यांच्यासह नागरीक कालव्यावरच उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत चाचणीला सुरवात झाली होती मात्र दुदैवाने पाउस थांबल्याने व काही ठिकाणी कालवा फोडण्यात आल्याने चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्या वेळी आ. छगन भुजबळ तुरु ंगात नसते तर चाचणी पूर्ण झाली असती अशी त्या भागातील शेतकर्यांची भावना आहे. आता छगन भुजबळ स्वत सक्र ीय झाल्याने पुणेगाव आण िदरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले तर या वेळेस कालव्याची चाचणी पूर्ण होणारच असा आशावाद लाभक्षेत्रातील जनतेला वाटत आहे. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला लाभक्षेत्रात येणाºया गावांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे; मात्र सदर कालव्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून, पूरपाणी सोडल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊ शकतो.

टॅग्स :Waterपाणी